साळवी स्टॉप येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपानप्रकरणी तरुणावर गुन्हा

Aug 7, 2024 - 12:25
 0
साळवी स्टॉप येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपानप्रकरणी तरुणावर गुन्हा

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वा. सुमारास करण्यात आली. रफिक पिरसाब अगरटगी (३१, रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. 

तो सोमवारी रात्री ८ वा. जलतरण तलावाच्या बाजूला सिमेंट कट्ट्यावर आपल्या समोर दारु घेऊन पिण्यासाठी बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow