गणेशोत्सवामुळे लांजा बाजारपेठ गर्दीने गजबजली

Sep 10, 2024 - 10:47
 0
गणेशोत्सवामुळे लांजा बाजारपेठ गर्दीने गजबजली

लांजा : मुबंई-गोवा महामार्गाच्या कामामुळे बाजारपेठेत नेहमी कमी दिसणारी गर्दी गणेशोत्सवामुळे वाढली आहे. नागरिकांच्या गर्दीने  बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजली असून लांजा शहर प्रवाशांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले आहे.

गणेशोत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा सुरू आहेत. नागरिकांची वर्दळ सुरू झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळे शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इतरवेळी कमी गर्दीने दिसणारी बाजारपेठ दोन दिवसांपासून पुन्हा एकदा गजबजली आहे. लांजा शहरातील दुकाने व संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. लांजा बसस्थानक, तहसील कार्यालय परिसर, विविध बँका, आपणा बाजार आदी ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. वाहतूक तसेच गर्दीवर नियंत्रणसाठी लांजा पोलिसांचा बंदोबस्त सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow