निवळी येथे गोवा बनावटीची दारू जप्त

Aug 8, 2024 - 12:20
 0
निवळी येथे गोवा बनावटीची दारू जप्त

चिपळूण : तालुक्यातील निवळी कोष्टेवाडी येथे गोवा बनावटीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. ४ हजार १२० रुपयांचे हे गोवा बनावटीचे मद्य असून पोलिसांनी या प्रकरणी सुमित अविनाश झिंगे (२९, रा. निवळी कोष्टेवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

ही घटना दि. ५ ऑगस्ट रोजी निवळी कोष्टेवाडी येथे उघडकीस आली. सुमित झिंगे हा गोवा बनावटीची व हातभट्टीची दारू विकत असताना पोलिसांना सापडला. त्याच्याकडून गोवा व हातभट्टी दारूच्या प्लास्टिकच्या ४४ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. अधिक तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow