खेड : रसाळगड किल्ल्यावर बसविण्यात आले सोलरलाईट

Aug 9, 2024 - 10:50
Aug 9, 2024 - 15:24
 0
खेड :  रसाळगड  किल्ल्यावर बसविण्यात आले   सोलरलाईट

खेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणी जपणाऱ्या किल्ले रसाळगडावर दुर्गसेवक किल्लेप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते प्रणव म्हापुसकर यांच्या पुढाकाराने सोलरलाईट आणि सूचनाफलक लावण्यात आले. याचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

किल्ल्यावरील श्री झोलाई वाघजाई देवी मंदिराच्या आवारातील पाण्याचे टाकी येथे सोलरलाईट बसविण्यात आले आहेत. या वेळी रसाळगड गावच्यावतीने म्हापुसकर यांचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे, सरपंच शरद गायकर, संभाजी सणस, अक्षय गायकर, पुजारी शिवाजी सकपाळ आदी उपस्थित होते. किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या फलकावर विविध सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांनी वर्तन व वागणूक योग्यच ठेवली पाहिजे तसेच गडावर कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, असे वर्तन करू नये. गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये. गडकिल्ल्यांवर स्वच्छता ठेवणे अशा प्रकारचे सूचनाफलक लावण्यात आले आहेत असे मापुस्कर यांनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow