लोकसभेला जोरदार झटका दिलात, कंबर मोडली, आमची चूक झाली; अजित पवारांची जाहीर कबुली

Aug 9, 2024 - 14:53
 0
लोकसभेला जोरदार झटका दिलात, कंबर मोडली, आमची चूक झाली; अजित पवारांची जाहीर कबुली

नाशिक : लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या (Farmers) आक्रोशाचा मोठा फटका भाजपला बसला आहे. विशेषत: कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Farmers) सरकारच्या विरोधात मतदान केल्यानं अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सरकारच्या या निर्णयाचा महायुतीला मोठा फटका बसला याची जाहीर कबुली खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेला मोठा झटका दिला आमची कंबर मोडली, चूक झाली, माफ करा असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. आमदार दिलीप बनकरांच्या निफाड मतदारसंघात अजित पवार दौऱ्यावर आहेत. त्यावेळी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांनी पुढचे बीज बिल भरायचे नाही, मागचे थकलेलं बिल द्यायचे नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. कांदा निर्यात आता बंद करायचे नाही. लोकसभेमध्ये जो झटका दिला तो जोरात लागला. कंबर मोडली,आमची चूक झाली माफ करा... जो काम करतो तोच चुकतो कांदा निर्यात बंदी करायची नाही, वीज बिल माफ करा हे निर्णय दिले. दूध,कापूस, सोयाबीन, भात यासाठी योजना आणल्या आहेत.

आम्हाला लाँग टर्म राजकारण करायचे : अजित पवार

अजित पवार म्हणाले, आम्हाला लाँग टर्म राजकारण करायचे आहे, औट घटकेचे राजकारण करायचे नाही. उद्या लाभ मिळाला नाहीत तर महिला मला जाब विचारतील. खोटा नेरेटिव्ह कोणी सेट केला तर त्याला बळी पडू नका, ही कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी आहे. योजना सुरू ठेवण्यासाठी 45 हजार कोटी रुपयांची योजना आहे. योजना सुरू राहण्यासाठी आम्ही पुढे गेले पाहिजे तुम्ही आमचे बटण दाबले पाहिजे. महिला धुणीभांडी करतात, काम करतात. आपल्या कुटुंबाला सक्षम करण्यासाठी काम करते. त्यांना काही आशा असतात. मी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. योजना,धरण प्रकल्पांना पैसे दिले. आमदारांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागणीसाठी प्रकल्पासाठी पैसे दिले. आज माता भगिनी स्वागत करत होत्या, भावाच्या नात्याने मला ओवाळले

आम्ही अभ्यास करणारी माणसे ,हवेत गप्पा मारणारी नाही; अजित पवारांचा टोला

आम्ही अडीच वर्षे सत्तेत होतो, त्यानंतर सरकार पडले, कसे पडले सर्वाना माहिती आहे. आम्ही किती दिवस सांगायचे सत्तेत नाही, सत्तेत आलो म्हणून विकास कामासाठी निधी देता आला. मी कोणाला दुखवण्यासाठी निर्णय घेतला नाही कामासाठी आलोय. आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत,हवेत गप्पा मारणारी नाही. तुमचा विश्वास पाहिजे. काम कसे करून घेतले पाहिजे हे महत्त्वाचे आहे. काल रात्री बैठक घेतली. सव्वा ते दीड कोटी प्रयत्न महिला पात्र ठरल्या आहेत अजूनही लाही नोंदणीचे काम सुरू आहेत, अडचणी येत अहेय. आम्ही त्यातून मार्ग काढत आहे. 17 तारखेल 6 हजार कोटींच्या फाईल वर सही केल्या आणि काल नाशिकला आलो, असे देखील अजित पवार म्हणाले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 09-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow