मंडणगड : संसद ग्रामयोजना, वेळास येथे पर्यटन केंद्र, बाणकोट बागमांडला सी-लिंक प्रकल्प रखडले

Aug 9, 2024 - 14:36
Aug 9, 2024 - 15:22
 0
मंडणगड : संसद ग्रामयोजना, वेळास येथे पर्यटन केंद्र, बाणकोट बागमांडला सी-लिंक प्रकल्प रखडले

मंडणगड : तालुक्यात सरकारस्तरावरून ठोस पावले उचलली त गेल्याने संधी उपलब्य असतानाही रोजगार निर्मितीचा उद्देश सफल होऊ शकला नाही, संसद ग्रामयोजना, वेळास येथे पर्यटन केंद्राची निर्मिती, बाणकोट बागमांडला सी-लिंक हे विकास प्रकल्प रखडले. या योजनांसाठी तत्कालीन काळातील केंद्र व राज्य सरकारमधील राज्यकर्ते सपशेल अपयशी ठरले आहेत, राज्यकर्त्यांच्या उदासीनतेचा फटका मात्र तालुक्याच्या विकासाला बसला आहे.

केंद्र व राज्य शासनाचे धोरणही विकासासंदर्भात अनुकूल असले तरी त्याचा प्रत्यक्षात तालुक्याला फायदा होताना दिसून आलेला नाही. तालुक्यातील विविध विकासयोजना मंजूर असूनही रखडलेल्या अवस्थेत आहेत. सन २०१४ साली आादर्श संसद‌ग्राम योजनेची मुहूर्तमेड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या मूळ गावात आंबडवेत करण्यात आली. ही योजना केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांशी योजना मानली गेली. आंबडवेत विकासकामांसंदर्भात कृती आराखडा कागदावर तयार झाला. मात्र प्रत्यक्षात आंबडवे राजेवाडी महामार्गाच्या निर्मिती व्यतिरिक्त कोणतेही विकासकाम या योजनेद्वारे झाले नाही.

बाणकोटचा बागमांडला सी लिंकची अशीच स्थिती आहे, सन २०१२- १३ मध्ये राज्य सरकारने मंजुरी देऊन सागरी पुलाचे काग सुरु झाले. मात्र, आजही हा पूल अपूर्ण अवस्थेत आहे. वेळास येथील भविष्यकालीन पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने निर्धारित केलेला वेळास येथे पर्यटन केंद्र प्रकल्पसुद्धा तूर्तास तरी बारगळल्याचे चित्र आहे तत्कालीन नेहमीच राजकर्त्यांनी उदासीनता दाखवलेली असल्याने तालुक्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साध्य झाला नाही.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे ऑलिव्ह रिडले जातीचे अत्यंत दुर्मीळ समुद्री कासवांचे गाव म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध असलेले वेळास गाव पेशव्यांचे दरबारातील कारभारी नाना फडणीस यांचे वेळास गाव, किल्ले मंडणगड, किल्ले बाणकोट, बारमाही वाहणारी विस्तीर्ण सावित्री नदी, वेळास बाणकोट येथे लाभलेला अरबी समुद्राचा किनारा व सह्याद्रीच्या उपपर्वत रंगांचे निसर्गरम्य आल्हादायक पर्यावरण ही बलस्थाने असूनदेखील आजपर्यंत पर्यटन विकास साधता आला नाही, पर्यटनदृष्टचा व्यवसाय नाहीच शिवाय नोकरीसाठी उद्योग प्रकल्पाही नाहीत अशी तालुक्याची अवस्था आहे. त्यामुळे तालुका अविकसित राहण्याचे प्रमुख कारण बेरोजगारी असल्याची कारणगिगांसा करता येईल,

बेरोजगारीमुळे नागरिकांचे स्थलांतर
तालुक्यास उद्योग प्रकल्प, एमआयडीसी यासाठी ठोस आश्वासक पावले उचललेली गेली नाहीत त्याचा थेट परिणाम येथील नागरिकांच्या जीवनमानावर झाला असून, बेरोजगारीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील पन्नास टक्क्याहून अधिक नागरिक मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. अनेक वर्षांपासून उद्योग प्रकल्पांची मागणी अजूनही राज्यकर्ते या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow