गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात ऋग्वेदी उत्सर्जन प्रयोग

Aug 10, 2024 - 09:58
Aug 10, 2024 - 10:07
 0
गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात ऋग्वेदी उत्सर्जन प्रयोग

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रीं च्या मुख्य मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी नागपंचमीचे औचित्य साधून समस्त गणपतीपुळे ब्रम्हवृंदांमार्फत सकाळी ८ वाजता सनातन धर्मशास्त्रातील चार वेदांपैकी प्रथम असणाऱ्या ऋग्वेदी उत्सर्जन (श्रावणी) प्रयोग अतिशय शास्त्रोक्त आणि धार्मिक अशा प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.

गणपतीपुळे मंदिरात पवित्र मानल्या गेलेल्या श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गणपती मंदिरात गणपती उत्सव  परिसरातील स्थानिक भजनी मंडळांच्या वतीने अतिशय भक्तिभावात भक्तिमय वातावरणात पार पाडण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी गणपतीपुळे येथील समस्त ब्रम्हवृंदांमार्फत सनातन धर्मशास्त्रातील चार वेदांपैकी प्रथम असणाऱ्या ऋग्वेदी उत्सर्जन (श्रावणी) प्रयोग अतिशय शास्त्रोक्त आणि धार्मिक अशा प्रसन्न वातावरणात संपन्न झाला. यावेळी गणपतीपुळे परिसरातील समस्त ब्रम्हवृंदांची उपस्थिती लाभली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow