खेड : नारिंगी नदीलगतच्या भातशेतीची नासाडी

Aug 10, 2024 - 11:15
Aug 10, 2024 - 12:15
 0
खेड : नारिंगी नदीलगतच्या भातशेतीची नासाडी

रत्नागिरी : खेड तालुक्यात आठवडाभर झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे नारिंगी नदीच्या पुराचे पाणी ४ ते ५ वेळा खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंगनजीक घुसून वाहतूक ठप्प झाली होती. नारिंगी नदी परिसरही जलमय होऊन चार-पाच दिवस भातशेती पुराच्या पाण्यात अडकल्याने भातशेतीची नासाडी झाली आहे.

भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नारिंगी नदीलगतच्या भातशेतीत वर्षानुवर्षे पाणी घुसून भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. पुराचे पाणी सखल भागातील भातशेतीमध्ये घुसत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यंदाच्या पावसाळ्यातही सलग ४ ते ५ वेळा नारिंगीला आलेल्या पुराच्या पाण्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेली भातशेती पूर्णतः कुजली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow