मनसे शेतकरी सेना गुहागर तालुकाध्यक्षपदी श्रीकांत कुष्टे यांची नियुक्ती

Jun 29, 2024 - 11:29
Jun 29, 2024 - 14:32
 0
मनसे शेतकरी सेना गुहागर तालुकाध्यक्षपदी श्रीकांत कुष्टे यांची नियुक्ती

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी प्रसाद श्रीकांत कुष्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रसाद कुष्टे यांना शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष उमेश लटके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस, सहकार सेना तालुका अध्यक्ष विनोद चिपळूणकर, विभाग अध्यक्ष नितिन कारकर, सामाजिक कार्यकर्ते नीलेश लांजेकर उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow