दापोली कृषी विद्यापीठात काहींचा मनमानी कारभार, सुधारणा न केल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडणार

Aug 10, 2024 - 17:24
Aug 10, 2024 - 17:30
 0
दापोली कृषी विद्यापीठात काहींचा मनमानी कारभार, सुधारणा न केल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडणार

रत्नागिरी : दापोली कृषी विद्यापीठात काहींचा मनमानी कारभार, सुधारणा न केल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतीत पत्रकार परिषदेत अधिक बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर म्हणाले, की काही आठवड्यापूर्वीच आमचे माजी उपाजिल्हाध्यक्ष महेंद्र गुळेकर व माजी शहरअध्यक्ष अरविंद मालाडकर व टीम दापोली विद्यापीठात गेले होते व त्यांनी 30 प्रकारचे प्रश्न विचारले होते की ज्या मध्ये अनियमितता दिसत होती. व त्याचं वेळी प्रति रॅगिंग समिती आहे का व त्यांची बैठक किंवा विद्यार्थी समुपदेशन मार्गदर्शन कधी होते याची विचारणा केली होती. त्यावरती समिती असल्याचे लेखी कळवले होते पण बाकीचे काही नाही. आणी काल ही रॅगिंग ची घटना उघडीस आली.

कंत्राटी कर्मचारी बद्दल सांगितलं की ज्यांनी 8 वर्षे पेक्षा आधीक काळ सेवा दिली आहे त्यांना सेवेत कायम करण्यासाठी काय हालचाली केल्या असे विचाराताच असे कर्मचारी नाहीत जे आहेत ते दोन चार वर्षे कामं करणारेच आहेत व त्यांना रोजंदारीवरच कामं करायची इच्छा आहे अशा प्रकारची उत्तरे मिळाली. पण मुळात कित्येक कर्मचारी आहेत जे 8 वर्षा पेक्षा अधिक काळ कंत्राटी म्हणून कामं करत आहेत.तसेच झाडगाव येथील समुद्र जीव संशोधन केंद्र येथे अद्यावत असे मतस्यालय उभे राहात आहेत. सदर जागा विद्यापीठाची आहे पण विद्यापीठ प्रशासन याबाबत अनाभिज्ञ् असल्याचे सांगितले आहे. वास्तविक पेठाकिल्ला येथे कोट्यावधी खर्च करून मत्स्यलय होत असताना अजून एक काय गरज आहे? कित्येक कर्मचारी हे सहा सहा वर्षे एकाच पदावर अडून आहेत त्यांना नियमानुसार तीन वर्षानी बदली कां नाही दिली? रजिस्ट्रार cafo व अभियंता या पदावर सरकारी अधिकारी नियुक्त झाले पाहिजेत त्यावर विद्यापीठ कर्मचारी कसे काय नियुक्त आहेत? याबाबत 2019 साली शासनाला एक पत्र पाठवून आपलं काम झाले असे होतं नाही त्यानंतर 2 सरकार बदलले पाठपुरावा कोण करणार?  सेवानिवृत्ती नंतर लगेचच संबंधित कर्मचारी कंत्राटी तत्वावर कसा काय हजर करून घेऊ शकतात? सगळ्यात महत्वाचे म्हणजे संपूर्ण देशात गाजत असलेल्या पूजा खेडकर प्रकरण. असे प्रकरण विद्यापीठात देखील असण्याची शक्यता आहे त्या संदर्भात माहिती मिळत आहे. काही कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच ते ही उघड करू. तसेच कृषी विभागाचे वेतन वेळेत होते पन मत्स्य विभागाचे दहा बारा दिवस उशिरा होते. हा मत्स्य शाखेवर अन्याय आहे. दापोली कृषी विद्यापीठ हे आमचे नाक आहे आमची अस्मिता आहे. येथील संशोधक प्राध्यापक व इतर कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देऊन विद्यापीठाला नावालौकिक मिळवून देत आहेत त्यांचा आम्हाला अभिमानच आहे पन काही निवडक चार ते पाच लोक हे विद्यापीठात मनमानी पणे कारभार करत आहेत त्याचा यां सगळ्या प्रामाणिक लोकांना त्रासच होतोय पण भविष्या लक्षात घेता उघड पणे बोलू शकत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे खाजगीत कबुली दिली.

हे सर्व प्रकार पहाता अत्यंत बेजबाबदार कारभार सुरु आहे ज्यावर कुलगुरूंचा अंकुश अजिबात दिसत नाहीये. या संदर्भात श्री. राज साहेब यांना व शर्मिला वहिनी ठाकरे यांना पूर्ण कल्पना पुराव्यानिशी दिली असून त्यांच्याच आदेशानुसार दापोली विद्यापीठाचा कारभारत सुधारणा दिसली नाही तर मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अविनाश सौंदळकर यांनी दिला. 

या प्रसंगी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, माजी उपजिल्हाअध्यक्ष महेंद्र गुळेकर, माजी शहर अध्यक्ष अरविंद मालाडकर, उपतालुका अध्यक्ष रूपेश चव्हाण पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:59 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow