लायन्स क्लब रत्नागिरी आणि जिल्हा पोलिस प्रशासन मार्फत महिला सुरक्षितता बद्दल जनजागृती मोहिमेला शिर्के शाळेतून शुभारंभ

Aug 30, 2024 - 12:45
 0
लायन्स क्लब रत्नागिरी आणि जिल्हा पोलिस प्रशासन मार्फत महिला सुरक्षितता बद्दल जनजागृती मोहिमेला शिर्के शाळेतून शुभारंभ

◼️ रत्नागिरी मधील विविध शाळांमध्ये हा उपक्रम करण्याचा लायन्स क्लब चा मानस

रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत दिनांक २९-८-२०२४ रोजी शिर्के प्रशाला या ठिकाणी विद्यार्थीनी व‌ विद्यार्थ्यांसाठी गुड टच आणि बॅड टच या बद्दल रत्नागिरी जिल्हा पोलिस दल यांचे मार्फत पीएसआय गायत्री पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले. 

जवळपास शिर्के शाळेतील ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या मध्ये सहभाग घेतला. सध्या समाजात घडत असलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत या ठिकाणी विद्यार्थीनींसाठी स्वसंरक्षण प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. एस.आर.के ॲकॅडमी मार्फत शालेय मुलींना संकट काळात स्वतःचा बचाव कसा करायचा या बद्दल त्वायकांदो चे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी लायन्स क्लब रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांचे मार्फत महिला सुरक्षा जनजागृती याबाबत ची माहिती देणारे माहिती पत्रक लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत प्रकाशित करुन विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे अशी जनजागृती जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये जाऊन करण्याचा मानस आहे.
 
या वेळी लायन्स क्लब अध्यक्ष ला गणेश धुरी, सचिव ला विशाल ढोकळे, ला संजय पटवर्धन, ला.उदय आपटे, ला साक्षी धुरी ला प्राची शिंदे, MJF लायन शबाना वास्ता, ला श्रेया केळकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:06 30-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow