चिपळूण : नारायण तलाव, शिवसृष्टी सुशोभीकरणांचे काम अंतिम टप्प्यात

Aug 12, 2024 - 15:39
Aug 12, 2024 - 17:20
 0
चिपळूण : नारायण तलाव, शिवसृष्टी सुशोभीकरणांचे काम अंतिम  टप्प्यात

चिपळूण : शहरातील सांस्कृतिक केंद्रानजीक उभारण्यात येत असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि शिवसृष्टीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच सुशोभित करण्यात येत असलेल्या नारायण तलावाचे कामही अंतिम टप्प्यात आले असून, या दोन्ही सुशोभीकरणांचा लोकार्पण सोहळा १८ ऑगस्ट रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही कामे पूर्ण करण्याकरिता ठेकेदारांनी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

सप्टेंबर २०१९ च्या दरम्यान इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रानजीक शब्दशिल्पाच्या बाजूला असलेल्या अनंत गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ माजी पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर परिसरात सुशोभीकरण कामाला वेगाने सुरुवात झाली. दरम्यान महापूर व पावसाच्या अडथळ्यामुळे काम काही प्रमाणात संथगतीने सुरू होते; मात्र यावर्षी कामाने वेग घेतला आहे.

दरम्यान, सामंत यांनी या कामाची प्रगती पाहून केवळ अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यावर उभारण्याऐवजी परिसरात शिवसृष्टी उभी करण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक तयार करण्याबाबत सूचना केली. या दृष्टीने आराखडा तयार करून निधीला मंजुरी दिली. शिवसृष्टी व सुशोभीकरणाला अतिरिक्त निधी मिळाल्याने कामाने पुन्हा वेग घेतला. सध्या संपूर्ण परिसरात शिवसृष्टी उभी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकाण अंतिम टप्प्यात आले आहे. १८ ऑगस्टपूर्वी संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने ठेकेदाराने पंधरा दिवसांपासून कामाचा वेग वाढीवाला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, १८ ऑगस्ट रोजी लोकार्पण सोहळ्यापूर्वी संपूर्ण काम य सुशोभीकरण होणार आहे. तसेच नारायण तलावाचे सुशोभीकरण शेवटच्या टप्प्यात आले असून याच दिवशी या तलावाचे लोकार्पण करून हा परिसर नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या दोन्ही कामांचे लोकार्पण होणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:05 PM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow