रत्नागिरी : दिराची भावजयीला मारहाण

Aug 13, 2024 - 10:16
 0
रत्नागिरी : दिराची भावजयीला मारहाण

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथे दिराने वहिनीला ढकलाबुकल करत कोणत्यातरी हत्याराने मारहाण केली. ही घटना रविवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. सुमारास घडली. 

विलास धोंडू ढवळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात जागृती दिलीप ढवळे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

त्यानुसार, जागृती आणि विलास हे नात्याने भावजय व दीर आहेत. रविवारी सकाळी १० वा. सुमारास जागृती ढवळे अंगणात कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी दीर विलासने काही कारण नसताना तिथे येऊन जागृतीला धक्काबुक्की करून कोणत्यातरी हत्याराने मारायचा प्रयत्न केला. यात त्यांच्या डाव्या डोळ्यावर, डाव्या हातावर, मानेवर दुखापती झाल्या आहेत. यावेळी त्यांचे वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या संकेत ढवळे आणि सूचिता ढवळे यांनाही विलासने शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow