संगमेश्वर : परचुरीत बिबट्याचा मुक्त संचार

Aug 13, 2024 - 12:44
 0
संगमेश्वर : परचुरीत बिबट्याचा मुक्त संचार

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून, रात्रीच्या दरम्यान येणाऱ्या बिबट्याने कुत्र्यांसह घरातील पाळीव कोंबड्यांना आपले लक्ष्य केले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. 

परचुरी गावात रात्रीच्या दरम्याने बिबट्या येत असल्याने भीतीचे वातावरण आहे. बिबट्या पाळीव कुत्र्यांबरोबर घरातील खुराड्यामध्ये ठेवण्यात येत असलेल्या कोंबड्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. चिखलाच्या ठिकाणी बिबट्याचे पंजे उमटलेले दिसत आहेत. वाशीमध्ये गवारेड्याचे दर्शन होत असून, शेतीचे नुकसान करत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow