रत्नागिरी : कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहू; नवीन भाजी मार्केट इमारतीतील गाळेधारकांचे हमीपत्र

Jul 26, 2024 - 11:00
Jul 26, 2024 - 11:05
 0
रत्नागिरी : कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहू; नवीन भाजी मार्केट इमारतीतील गाळेधारकांचे हमीपत्र

रत्नागिरी : शहरातील धोकादायक नवीन भाजी मार्केट इमारतीतील वीज जोडणीसंदर्भात गाळेधारकांनी न्यायालयाला हमीपत्र दिले. खंडित वीजपुरवठा सुरू करून मिळण्याबाबत न्यायालयात मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी नगर परिषदेच्या वकिलांनी येथील वायरिंग फार जुने आहे. इमारतीला गळती लागलेली असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर परिषदेने या इमारतीतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे सांगितले. गाळेधारकांनी कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहू, असे हमीपत्र दिले. आता पुढील सुनावणी येत्या बुधबारी होणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची नवीन भाजी मार्केटची इमारत धोकादायक झाल्याने सात वर्षांपूर्वी गाळे रनपच्या ताब्यात देण्याबाबतची नोटीस बजावली. या नोटीस विरुद्ध गाळेधारकांनी न्यायालयात दाद मागून गाळे ताब्यात घेण्याबाबतच्या आणि वहिवाटीस रनपने अडथळा आणू नये, असा आदेश होण्याची न्यायालयाला विनंती केली आहे.

न्यायालयात याप्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी गाळेधारकांकडून इमारतीचा वीजपुरवठा खंडित झाला असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर रनपचे वकील निलांजन नाचणकर  यांनी इमारतीत येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे सांगितले. वीजेचा झटका, आग अथवा इतर दुर्घटना होऊन जीवित, वित्त हानी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. गाळेधारकांनी अशा दुर्घटनेतून कोणतीही हानी झाल्यास नगर परिषद, महावितरण जबाबदार राहणार नाही. आम्ही जबाबदार राहु असे हमीपत्र दिल्यास आमची वीजपुरवठा सुरू करण्याबाबत हरकत नसल्याचेही सांगितले. त्यानुसार रनपने महावितरणला वीजपुरवठा सुरू करून देण्याबाबतची विनंती केली असून, पुढील सुनावणी आता येत्या बुधवारी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow