रत्नागिरी : गाडीतळ भागातील शौचालयाचे सांडपाणी रस्त्यावर

Aug 13, 2024 - 16:46
 0
रत्नागिरी : गाडीतळ भागातील शौचालयाचे सांडपाणी रस्त्यावर

त्नागिरी : येथील गाडीतळ भागातील शौचालयाचे पाणी रस्त्यावरून वाहत असून पादचाऱ्यांना त्याच रस्त्यावरून चालत जाण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जिल्ह्यात अनेक भागात डेंग्यूची मोठी साथ आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन रत्नागिरी नगरपालिकाही वारंवार करीत असते. मात्र पालिकेच्याच गटारातून वाहत आलेले शौचालयाचे पाणी भर रस्त्यात वाहत आहे. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभागच स्वतःहून डेंग्यूला निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे. गाडीतळ परिसरात प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या बाहेर नगरपालिकेच्या गटाराचे भले मोठे चेंबर आहे. गेल्या काही दिवसांपासून हे चेंबर तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. या चेंबरमधून शौचालयाचे सांडपाणी मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. याच रस्त्यावरून विद्यार्थ्यांसह नागरिकांचीदेखील नेहमी ये जा सुरू असते. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीदेखील पसरली आहे. त्यामुळे या परिसरात नवी साथ पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. पालिकेने यात लक्ष घालून तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow