बदलापूर घटनेचा चिपळूणमध्ये जाहीर निषेध

Aug 22, 2024 - 11:21
 0
बदलापूर घटनेचा  चिपळूणमध्ये जाहीर निषेध

चिपळूण : बदलापूर येथे शाळेतील चिमुकलीवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून बुधवारी चिपळूणमधील महिलांच्या जनभावना उसळल्या. या घटनेचा आणि महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महिलांनी आंदोलन केले, आम्हाला लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहीण योजना हवी, अशी मागणी संतप्त महिला आंदोलकांनी केली.

येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात महिलांनी आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार आणि पोलिस ठाण्पात जाऊन महिलांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शंभरहून अधिक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरन
कालुस्ते गावच्या सरपंच डॉ. रेहमत जवले यांनी भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. सामाजिक कार्यकर्त्या सुमती जांभेकर म्हणाल्या, शासनाने अशा नराधमांवर कारवाई करण्यासाठी केवळ फास्टट्रॅक कोर्ट स्थापन करून चालणार नाही, फास्टट्रॅक कोर्ट मध्ये सुद्धा लवकर निर्णय लागत नाहीत. 

त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेतले पाहिजे. स्वात्ती भोजने म्हणाल्या आरोपीला आजच फाशी द्या, नाहीतर आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण गोजना आणा, असे फलकही आंदोलकांकडून झळकले, चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष रेहना बिजले म्हणाल्या, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भाषण घटना घडली, त्यावर कारवाई व्हायला इसका वेळ का लागला? मुळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा या जिल्हयातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.

बुधवारी सकार "लाडकी बहीण" योजनेव्याहारे, स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न असल्याचे बिजले यांनी सांगितले.

जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देवून, स्वतःचं बोर्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. असे शामल तटकरे यांनी सांगितले. असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अंजली कदम यांनी सांगितले, रुही खेडेकर महणाल्या, अकोल्यामध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार झाला, बदलापूर मध्ये चिमूरडयांवर अत्याचार झाला सरकारला त्याचे गांभीर्य आहे की नाही.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow