गुहागर : फेरीबोटीत अडकून महिलेच्या पायाला गंभीर दुखापत

Aug 14, 2024 - 10:48
 0
गुहागर : फेरीबोटीत अडकून महिलेच्या पायाला गंभीर दुखापत

गुहागर : दाभोळवरून धोपावेला जाणाऱ्या पावणेचारच्या फेरीबोटमधून उतरत असताना फेरीबोटचा लोखंडी फाळका महिलेच्या पायावर गेल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाली आहे. 

दाभोळवरून पावणेचार वाजता सुटलेली फेरीबोट धोपावे येथे येताच अनेकजण उतरण्याची घाई करतात; मात्र हीच घाई या महिलेच्या जीवावर बेतली असती. एसटी पकडण्यासाठी या महिलेने घाई करून धोपावे जेटीला फाळका लागण्यापूर्वीच फेरीबोटीतून उडी मारली; मात्र मागून येणाऱ्या फाळक्यात या महिलेचा पाय अडकला. आरडाओरड करताच मोटरमनने फेरीबोट मागे घेऊन थांबवली. त्यानंतर फेरीबोटवर असणाऱ्या नागरिकांच्या मदतीने महिलेला बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेत महिलेचा जीव वाचला आहे; मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे धोपावे फेरीबोटवर मोठा गोंधळ उडाला. सदर महिलेला दाभोळमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावर्डे डेरवणला हलवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 14-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow