रत्नागिरीला तायक्वांदो स्पर्धेत १४ पदके

Jul 27, 2024 - 10:13
Jul 27, 2024 - 16:16
 0
रत्नागिरीला तायक्वांदो स्पर्धेत १४ पदके

रत्नागिरी : तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने दि. १९ ते २१ जुलै २०२४ या कालावधीत चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचा सहभाग होता. या स्पर्धेत रत्नागिरीच्या युवा तायक्वांदोच्या खेळाडूंनी तब्बल १४ पदके मिळवली.

या संघात जिल्हा संघटनेला अधिकृत मान्यता असलेली तालुक्यातील युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप ओम साई मित्र मंडळ येथे सुरु असलेल्या तायक्वांदो प्रशिक्षण वर्गातील स्वरा हर्षल तेरवणकर सुवर्णपदक, नीलाक्षी राजेश राहटे-सुवर्णपदक, वेदांत संतोष देसाई - सुवर्ण पदक, नूपुर नीलेश दप्तरदार-सुवर्णपदक तसेच योगराज सत्यविजय पवार याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

सुवर्णपदकांबरोबरच या स्पर्धेत नुपूर नीलेश दप्तरदार कांस्य, उपर्जना राम कररा- कांस्य, रुद्धी मधुर धुळप कांस्य, भार्गवी सत्यविजय पवार कांस्य, अर्णव हेमराज निर्मल कांस्य, योगराज सत्यविजय पवार कांस्य, वेदांत संतोष देसाई -कांस्य, योगराज एस. पवार - कांस्य, भार्गवी सत्यविजय पवार कांस्यपदक याप्रमाणे युवा रत्नागिरीच्या तायक्वांदोपटूंनी यश संपादन केले.

या खेळाडूंनी राज्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत पूमसे प्रकारात प्रथम क्रमांक तर व साधिक जनरल तिसरा क्रमांकाची ट्रॉफी रत्नागिरी जिल्ह्याने पटकावली आहे. वरील सर्व यशस्वी खेळाडूंना तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन अध्यक्ष श्री. वेंकटेश्वर राव कररा (जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार विजेते) उपाध्यक्ष शैलेश गायकवाड विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, संजय सुर्वे व सर्व पदाधिकारी तसेच कै. अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालयचे अध्यक्ष अनंत आगाशे युवा मार्शल टायकोंडो ट्रेनिंग सेंटरचे सर्व पदाधिकारी पालक, प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले.

या स्पर्धेतील विजेत्या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा, महिला प्रशिक्षिका सौ. शशीरेखा कररा, सहप्रशिक्षक प्रतिक पवार यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा संघाचे संघ प्रशिक्षक म्हणून युवा अॅकॅडमीचे प्रशिक्षक अमित जाधव, महिला प्रशिक्षिका सौ. शशिरेखा कररा यांनी काम पहिले. युवा तायक्वांदोच्या खेळाडूंनी या स्पर्धेत तब्बल १४ पदकेयशस्वी सर्व खेळाडू व प्रशिक्षक याचे जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow