राजापूर मतदारसंघ भाजपलाच द्यावा : उल्का विश्वासराव

Aug 14, 2024 - 11:01
 0
राजापूर मतदारसंघ भाजपलाच द्यावा : उल्का विश्वासराव

लांजा : आगामी विधानसभा निवडणुकीत लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपलाच मिळावा आणि स्थानिक उमेदवार असावा, अशी विधानसभा क्षेत्रातील सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकत्यांची मागणी आहे. त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर मागणी केली आहे. पक्षाकडून कार्यकत्यांच्या मागणीचा विचार केला जाईल, असे भाजपच्या राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना विश्वासराव यांनी सांगितले, मागील लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे पदवीधर निवडणुकीतही भाजपला यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाला या विधानसभा मतदारसंघात ५४ हजारांचे मतदान झाले आहे. हे पाहता विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष विजयाची 'मॅजिक फिगर' नक्कीच गाठू शकतो. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपला मिळावा आणि स्थानिक उमेदवार असावा, अशी आपल्यासह मतदार संघातील सर्व तमाम भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow