सदैव जागृत राहिल्यास फसवणूक टाळणे शक्य : सीए मंदार गाडगीळ

Sep 2, 2024 - 11:15
 0
सदैव जागृत राहिल्यास फसवणूक टाळणे शक्य : सीए मंदार गाडगीळ

त्नागिरी : डिजिटल पेमेंट, मेसेजवरून आलेली लिंक, अनोळखी नंबरवरून आलेला फोन अशा अनेक कारणांनी फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. भीती टी किंवा पैसै मिळणार आहेत म्हणून अनेक लोक या फसव्या लिंकला क्लिक करून फसतात.

परंतु हे टाळण्याकरिता सदैव जागृत राहावे. अनेकदा सुशिक्षित व्यक्तीसुद्धा फसवणुकीला बळी पडतात. हे टाळण्यासाठी कायम दक्ष राहिले पाहिजे, असे आवाहन सीए मंदार गाडगीळ यांनी केले.

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आर्थिक साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता हा कार्यक्रम झाला.

गाडगीळ म्हणाले की, सर्व गोष्टींकडे बारकाईने पाहिले पाहिजे. काय केले तर काय होऊ शकते, याची माहिती घेतली पाहिजे. अनेकदा मोबाइलवर ओटीपी पाठवून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. आपला बीएसएनएल कंपनीचा नंबर बंद पडणार आहे, शेअर मार्केटच्या नावाखाली, पैसे दुप्पट करून देतो, अशा विविध कारणांमधून फसवणूक केली जाते. ऑनलाइन पेमेंट करतानासुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपला पासवर्ड कोणालाही सांगू नये. एटीएममधून पैसे काढताना काळजी घ्यावी. सायबर सिक्युरिटीची माहितीसुद्धा घेणे आवश्यक आहे. अनेकदा चांगली शिकलेली व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकसुद्धा भीतीपोटी माहिती देतात व फसवणूक होते. आपण सजग राहूनच आर्थिक व्यवहार केले पाहिजेत.

सीए इन्स्टिट्यूट शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमाचा हेतू सांगितला. वकिलीच्या विद्यार्थ्यांना याची माहिती मिळण्याकरिता कार्यक्रम आयोजित केला आहे. वित्तीय साक्षरता याविषयी सीए इन्स्टिट्यूट काम करत आहे. सीए इन्स्टिट्यूट ही देशाच्या विकासाकरिता भरीव योगदान करत असल्याने केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांत सहकार्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow