संगमेश्वर : डिंगणी प्राथमिक शाळेच्या पाण्याच्या टाकीमध्ये चिखलाचा थर

Aug 16, 2024 - 10:33
 0
संगमेश्वर : डिंगणी प्राथमिक शाळेच्या पाण्याच्या टाकीमध्ये चिखलाचा थर

संगमेश्वर : तालुक्यातील डिंगणी येथील प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या लहान चिमुकल्या मुलांना पाण्याच्या टाकीतील चिखलमिश्रित व अळ्या वळवळणारे अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. या टाकीत चिखलाचा थर बसला आहे तेच पाणी पोषण आहार शिजवण्यासाठी वापरला जात आहे. हा चिमुकल्या जीवाशी एकप्रकारे खेळ सुरू असून याची त्वरित दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

येथील दुसऱ्या टाकीवरचे झाकणच गायब असल्याने उघड्या असलेल्या टाकीतील अवस्था पाहून व दुर्गंधीमुळे तसेच पाण्यावर वळवळणारे अळ्या पाहून याचा फटका मुलांना बसू शकतो. शासनस्तरावरून स्वच्छता राखा रोगराई टाळा, असा नारा देण्याबरोबरच पाण्यासारखा पैसा ओतला जात असताना दुसरीकडे मात्र जेथून शालेय अभ्यासाचे धडे गिरवणाऱ्याबरोबर स्वच्छतेचे धडे शिकवले पाहिजेत त्या ठिकाणी मुलांना अस्वच्छतेत वावरण्याबरोबरच रोगसईला निमंत्रण देणारे चिखलमिश्रित दुषित तसेच अळ्या वळवळणारे पाणी पिऊन कोरड्या घशाची तहान भागवतानाच त्याच दूषित पाण्याने शिजवलेल्या पोषण आहाराचे घास खावे लागत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow