गुहागर : अडूर कोंडकारूळमधील मच्छीमार कुटुंबातील तरुण बनला 'पीएसआय'

Aug 3, 2024 - 10:31
 0
गुहागर : अडूर कोंडकारूळमधील मच्छीमार कुटुंबातील तरुण बनला 'पीएसआय'

गुहागर : पोलिस खात्यात भरती होणे हे मिळविलेल्या या यशामुळे ग्रामीण भागातील अन्य अनेकांचे स्वप्न असते. त्यातही 'पीएसआय' पदासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते, अंगावर खाकी वर्दी असावी यासाठी आज लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. आपणही पोलिस होऊन तो मान मिळवावा, असे अनेकांना वाटते. गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारुळ येथील प्रसन्न अनिल जागकर याने पीएसआय (पोलिस उपनिरीक्षक) परीक्षेत यश मिळविले आहे. 

सर्वसामान्य मच्छीमार कुटुंबातील प्रसन्न जागकर याने समाजातील लोकांचे घरापुरती जागा व छोटेखानी घर हीच त्यांची मालमत्ता. बाकी त्यांचे जीवन समुद्रातील जीवघेणी मासेमारी व्यवसायाशी निगडित असते. प्रसन्न याने बीए, डीएड करून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. सध्या तो मंत्रालयातील गृह खात्यात लिपिक पदावर कार्यरत आहे.

प्रसन्न पीएसआय झाल्याचे कळताच त्याच्या जन्मगावी कोंडकारुळमधून समाधान व्यक्त होत आहे. आपल्या यशाचे श्रेय मोठा भाऊ राहुल व संपूर्ण कुटुंबीयाला त्याने दिले आहे. अडूर कोंडकारुळ गावच्या इतिहासात प्रथमच पोलिस उपनिरीक्षक पदाला प्रसन्नच्या माध्यमातून यश मिळाले आहे. यामुळे गावासोबतच सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. खेडेगावातील मुलांसाठी हा आदर्श म्हणावा लागेल, अशी प्रतिक्रिया ग्रामदेवता सुंकाई देवी चतुःसीमा देवस्थानचे हरिश्चंद्र गुरव यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow