लाडक्या बहिणींची बँकेत गर्दी

Aug 17, 2024 - 10:29
 0
लाडक्या बहिणींची बँकेत गर्दी

रत्नागिरी : बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचे पैसे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शासनाकडून वितरित करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाची सुटी संपल्यावर लाडक्या बहिणींची शुक्रवारी धावपळ सुरू झाली. अनेक बहिणी पैसे काढण्यासाठी बँकेत आल्या. अनेक बहिणींनी दिलेली बँक बदलली होती. काही बहिणींच्या मोबाईलवर बँक खाते आधारला लिंक नसल्याचा संदेश आला. त्यामुळे तीन हजार रुपयांची ओवाळणी घेण्यासाठी बहिणींची धावपळ, पळापळ सुरू झाली आहे.

शुक्रवारी बँक उघडण्यापूर्वीच महिलांनी गर्दी केली होती. या गर्दीमध्ये खात्यावर जमा झालेली रक्कम काढण्यासाठी आलेल्या महिलांची संख्या अधिक होती. त्याचप्रमाणे आपले पैसे नेमके कोणत्या बँकेत जमा झालेत याची खात्री करण्यासाठी काही महिला आल्या होत्या. याबाबत चौकशी केली होती तेव्हा लक्षात आले की, लाडकी बहीण योजेनेचे फॉर्म भरताना, विवाहित महिलांनी तेथील बँकेचे तपशील आणि आधार कार्ड दिले होते. प्रत्यक्षात त्यांचे पैसे पहिल्यांदा आधार लिंक असलेल्या बँकेत जमा झाले होते. त्यामुळे या विवाहित पहिली बँक असलेल्या शाखेत चौकशी करण्यासाठी आल्या होत्या. बँकेकडून पुन्हा केवायसी केल्याशिवाय योजनेचे पैसे मिळू शकत नसल्याने त्यांची केवायसी पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow