निषेध निषेध निषेध!! इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय पातळीवरील एक दिवसीय बंदला इंडियन डेंटल असोसिएशनची साथ

Aug 17, 2024 - 10:42
 0
निषेध निषेध निषेध!! इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय पातळीवरील एक दिवसीय बंदला इंडियन डेंटल असोसिएशनची साथ

रत्नागिरी : कोलकाता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या महिला डॉक्टरवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला व तेवढेच नाही तर तिची हत्याही करण्यात आली. तेथील प्रशासनाचा, पोलीस यंत्रणेचा हलगर्जीपणा असो किंवा सर्व पुरावे मिटवून हा बलात्कार नसून आत्महत्या असल्याचे सिद्ध करण्याचा ठरावबद्ध प्रयत्न असो, अशावेळी देशात फक्त महिला डॉक्टरांनाच नव्हे तर सर्व स्त्रियांना सुरक्षिततेची हमी कोण व कशी देणार? या अमानुष घटनेमुळे सर्व सुजाण नागरिकांना व देशातील सर्व डॉक्टर्सना तीव्र वेदना जाणवत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेने राष्ट्रीय पातळीवर आपला निषेध नोंदविला आहे. 

या क्रूर घटनेतील मुख्य आरोपींना लवकरात लवकर गजाआड करण्यात यावे व या घटनेत मृत पावलेल्या महिला डॉक्टरला आणि तिच्या संपूर्ण परिवाराला न्याय मिळावा व देशातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी गरजेच्या तरतुदी करण्यात याव्या हा ह्या निषेधामागील हेतू आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोबत इंडियन डेंटल असोसिएशनने सुद्धा आपला जाहीर निषेध नोंदविला आहे. ह्या निषेधार्थ इंडियन डेंटल असोसिएशन च्या रत्नागिरी शाखेने दि. १७.०८.२०२४ रोजी संपूर्ण दिवस दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळीता इतर सर्व दंत उपचार केले जाणार नाहीत. मूलभूत मानवी सुरक्षिततेच्या हक्कांसाठी आपणही आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow