Ratnagiri : डॉक्टरकडून रुग्ण युवतीचा विनयभंग

Aug 17, 2024 - 10:53
 0
Ratnagiri : डॉक्टरकडून रुग्ण युवतीचा विनयभंग

राजापूर : फॅमिली डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या युवतीचा विनयभंग केल्याची घटना जिल्ह्यातील एका गावात दोन दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. रंगराव पाटील (वय ६९) या संशियिताविरोधात पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला सर्दी व ताप होता. यासाठी ती मंगळवारी (ता. १३) या डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली होती; मात्र तिला बरे न वाटल्याने ती पुन्हा बुधवारी (ता.१४) सायंकाळी लहान भावासह या डॉक्टरकडे गेली. संशयित डॉक्टरने या पीडित युवतीला तपासले. तुला सलाईन लावण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तिच्या भावाला इंजेक्शनची चिठ्ठी लिहून देत ते आणण्यास पाठवले. यानंतर डॉक्टरने पीडितेशी अश्लील वर्तन केले. सलाईन संपल्यावर पीडिता घरी गेली व तिने हा घडला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित डॉ. रंगराव पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अधिकारी हेडकॉन्स्टेबल हर्षदा चव्हाण अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. पीडितेचा इन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आला. संशयिताचे वय ६५च्या वर असल्याने त्याला वेळोवेळी पोलिस तपास व न्यायालयीन प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याची सक्त सूचनेची नोटीस देण्यात आल्याचेही पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow