लांजा : अपघातप्रकरणी चिरेखाण मालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

Aug 17, 2024 - 11:14
Aug 17, 2024 - 11:31
 0
लांजा :  अपघातप्रकरणी  चिरेखाण मालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

लांजा : सोमवारी (ता. १२) रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास लांजा-दाभोळे रस्त्यावरीत तळवडे- आडवली दरम्यान चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातप्रकरणी संबंधित ट्रकमालक व चिरेखाण मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस निरीक्षक यांना सादर करण्यात आले आहे.

१२ ऑगस्टला रात्री चिरे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला लांज-दाभोळे मार्गावरील तळवडे-आडवलीदरम्यान अपघात झाला होता. या अपघातात ट्रकचालक व क्लिनर जागीच ठार झाले होते. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त चिरे भरलेले असल्याने हा अपघात झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. हा अपघातग्रस्त ट्रक वाहतुकीस योग्य होते का? तसेच या ट्रकची सर्व कागदपत्रे प्रमाणित आहेत का? चालकाचे ड्रायव्हर लायसन आहे का? आणि सर्वात महत्वाचे चिरे वाहतूक करण्याचा त्याच्याजवळ पास आहे का? या सर्व बाबी अतिशय महत्वाच्या असल्याने त्या पोलिस तपासात तपासण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर ट्रक ज्या चिरेखाणीवर भरण्यात आला आहे त्या चिरेखाण मालकावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच अनधिकृतपणे चिरे उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांकडे कानाडोळा करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरहीदेखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

सदरचे निवेदन देताना शिवसेनेचे नगरसेवक राजेश हळदणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा धावणे, काँग्रेसचे महेश सप्रे, युवासेनेचे तालुकाधिकारी प्रसाद माने, राष्ट्रवादी (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्के, शिवसेनेचे शहरप्रमुख नागेश कुरुप, दीपक शेट्ये, रमेश घाग, दानी गडहिरे आदी उपस्थित होते.

त्या अधिकाऱ्यांची चौकशी करा
अनधिकृतपणे चिरे उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांकडे कानाडोळा करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरहीदेखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लांजावासींनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 17/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow