रत्नागिरी : सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथे पोर्ट औद्योगिक क्षेत्र

Aug 17, 2024 - 11:32
 0
रत्नागिरी : सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथे पोर्ट औद्योगिक क्षेत्र

रत्नागिरी : शहराजवळील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या भागातील १७६.१४९ हेक्टर खाजगी क्षेत्र पोर्ट औद्योगित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना २९ जुलैला जारी झाली आहे. विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग क्षेत्राला चालणा मिळावी, नवे उद्योग यावे यासाठी प्रत्येक तालुक्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राजापूरची घोषणा झाली होती. आता मिऱ्या येथील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहिर केले आहे. लॉजिस्टिक पार्क हे एक औद्योगिक क्षेत्र आहे जे विशेषतः विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी, पॅकेज करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी उभारले जाते.त्यासाठी १७६, १४९ हेक्टर आर क्षेत्र भुसंपादीत करण्यात येणार आहे हे. खाजगी क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे प्रकरण ६ च्या तरतूदी लागू केल्या आहेत. सदरचे क्षेत्र कलम २ खंड (ग) नुसार अधिसूचित करण्याचा प्रस्तावास अधिनियमाच्या कलम ३२(१) पुर्वी खालील अटीच्या अधीन राहून क्षेत्र अधिसूचित करण्यास शासन मंजूरी दिली आहे. २६ जुलै २०२४ च्या शासन राजपत्रात प्रसिध्द केली आहे. खाजगी क्षेत्राच्या संदर्भात भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकताचा हक्क अधिनियम २०१३, मधील तरतूदीनुसार नुकसान भरपाईची दराची रक्कम उच्चतम दराने द्यावी व सदर क्षेत्रातील बहुतांश भूसंपादन हे संमतीने संपादीत करण्यात यावे, असे स्पष्ट म्हटले आहे. भूसंपादन कार्यवाहीसाठी रत्नागिरी प्रांताधिकारी यांची नियुक्ती केली आहे. मात्र ही अधिसूचना जारी झाल्यापासून स्थानिकांनी या प्रकल्पाविरोधात सूर उगवला आहे. परंतु या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. लॉजिस्टिक पार्क हे एक औद्योगिक क्षेत्र आहे जे विशेषतः विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी डिझाइन केलेले आहे. या व्यतिरिक्त, लॉजिस्टिक्स पार्कमधून कार्यरत कंपन्या त्यांचा वापर सहसा उत्पादने एकत्र करण्यासाठी, पॅकेज करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी किंवा हलके उत्पादन करण्यासाठी करतात. कंपन्या स्थानिक बाजारपेठा, प्रादेशिक बाजार किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ चालवण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी लॉजिस्टिक पार्क वापरू शकतात.

 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow