रत्नागिरी : सावरकर नाट्यगृहात शस्त्रात्र प्रदर्शन

Aug 19, 2024 - 12:32
 0
रत्नागिरी : सावरकर नाट्यगृहात शस्त्रात्र प्रदर्शन

रत्नागिरी : डिफेन्सशी निगडीत प्रकल्प रत्नागिरीत येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सावरकर नाट्यगृहात संरक्षण विषयक साहित्याचे प्रदर्शन भरविले होते. विद्यार्थी व नागरिकांनी या शस्त्रात्रांची माहिती घेतली.

शस्त्रांच्या या प्रदर्शनात विविध प्रकारच्या बंदुकांचा सामावेश होता. त्यामध्ये ३८ एम.एमची गॅस गन (लांबी ७१० एमएम), ५९५ ग्रॅम वजनाचे ९ एमएम ग्लॉक पिस्टल, एम. पी५ सबमिशन गन ९, कॅलिबर ९ एमएम, तसेच ३.४५२ किलो ग्रॅम वजनाची ७.६२ एमएम एके एम असॉल्ट रायफलही प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. त्याची लांबी ९०० एमएम होती, त्याचे कॅलिबर ७.६२ एमएम, तर ३० राऊड या रायफलमधून केले जातात. ९ एमएम मशीन कार्बाईन १ ए १ एसएएम जिच्यातून ३४ राऊड होतात व १२८० फूट प्रती सेकंद ही मारा करते. तिची लांबी २७ इंच आहे. ही पाहण्यास विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातील आमीं नेव्हीत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी कुतूहलाने या सर्व गन, रायफलची माहिती घेत होते. त्याच बरोबर पिस्टल ब्राऊनिंग एमएन ९ एम.एमएच.पी ज्याचे वजन २ पौंड, तर त्याची मॅग्झीन कपॅसिटी १३ राऊण्ड, तर मजल ११२० फूट प्रति सेकंद जाणारी होती. प्रत्येक हत्याराची वापरण्याची पद्धत, त्याचे स्लाईड लॉकिंग लिव्हर, ट्रिगर गार्ड, मॅगझीन कॅप, सेफ्टी कॅच, कॅलिबर, वजन, लांबी बॅरलची लांबी, ग्रुज, मजल व्हेलिसीटी, मॅगझीन कॅपेसीटी, सिलेंडर कॅपेसिटी, कारगर रेंज आदी माहिती फ्लेक्सच्या माध्यमातून प्रदर्शनात दाखविण्यात आली होती.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 8/19/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow