चिपळूण : सावर्डे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन

Aug 20, 2024 - 10:48
 0
चिपळूण :  सावर्डे  इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन

सावर्डे : येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये टाकाऊ वस्तूपासून ते टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन मांडले, ज्येष्ठ पालक रामचंद्र बने यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उ‌द्घाटन केले.

यावेळी संस्थेचे सचिव महेश महाडिक, पतसंस्थेचे सचिव नामदेव गावडे उपस्थित होते. यामध्ये इयत्ता नर्सरी ते सीनिअर के.जी. च्या विद्यार्थ्यांनी थब प्रिंटिंग तसेच इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पेपर अॅक्टिव्हीटी केली. तिसरी ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी लोकरपासून वस्तू तयार केल्या तर पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुतळीपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या व सातवी ते आठवीच्या विद्याथ्यांनी फळांच्या टरफलांपासून व टाकाऊ कपडांपासून वस्तू तयार केल्या. नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी फुलदाणी आणि बाटल्यांवर पेंटिंग करून उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.

या प्रदर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष व शालेय समित्तीच्या सदस्य पूजा निकम, प्रशांत निकम, पॉलिटेक्नीक कॉलेजचे प्राचार्य भोसले, प्रकाश राजेशिर्के, आयटीआयचे प्राचार्य लकेश्री यांच्यासह विद्यार्थी उपस्थिती होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow