रत्नागिरी : बुडणाऱ्या नौकेतील तांडेलांना वाचविण्यात तटरक्षक दलाला यश

Aug 30, 2024 - 09:42
Aug 30, 2024 - 11:41
 0
रत्नागिरी : बुडणाऱ्या नौकेतील तांडेलांना वाचविण्यात  तटरक्षक दलाला यश

◼️ *हेलिकॉप्टरने रेस्क्यू करत वाचविले प्राण*

रत्नागिरी : मासेमारी संदर्भातील चाचणी करण्यासाठी गेलेली लोखंडी मच्छीमार नौका पूर्णगड समुद्रात असताना नौकेत समुद्राचे पाणी भरू लागले. हे पाणी बाहेर काढणारा पंपही बिघडल्याने ती नौका बुडण्याच्या स्थितीत असल्याने त्यावरील तांडेल आणि उपतांडेलला तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वाचवले.

रत्नागिरी तालुक्यातील नाणिज येथील भागवत यांच्या मालकीची माऊली लोखंडी नौका मासेमारीपूर्व आवश्यक असणारी चाचणी आवश्यक असणारी चाचणी घेण्यासाठी समुद्रात गेली होती. पूर्णगड समुद्रात १२ ते १३ बाव अंतरावर आल्यानंतर वादळी वाऱ्यामुळे उसळणाऱ्या उंच लाटांमुळे नौकेत पाणी भरू लागले. तांडेल आणि उपतांडेल यांनी नौकेतील पाणी बाहेर काढण्याचा पंप सुरू केला. परंतु हा पंपही बिघडल्याने नौकेला जलसमाधी मिळण्याची भीती निर्माण झाली. हा धोका नौका मालकाला तांडेल यांनी कळवल्यानंतर लगेचच मत्स्य व्यवसाय आणि तटरक्षक दलाला याची माहिती देण्यात आली. नौकेवरील तांडेल आणि उपतांडेल वाचावेत यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौका आणि तटरक्षक दलाची नौका सायंकाळी ५ वा. च्या सुमारास समुद्रात घटनास्थळी रवाना झाली होती.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचना
तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने माऊली मच्छीमार नौकेतील दोन तांडेलना वाचवले, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आनंद पालव यांनी तटरक्षक दलाच्या कमांडरना प्रसंगाचे गांभीर्य सांगून हेलिकॉप्टरची मदत पाठवण्यास सांगितली. त्यानुसार तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास त्या बुडत्या नौकेतून तांडेलांना उचलून सुखरूप किना-यावर आणले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 30/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow