रक्षाबंधनासाठी निघालेल्या 23 वर्षीय भावाचा अपघातात मृत्यू

Aug 20, 2024 - 12:55
 0
रक्षाबंधनासाठी निघालेल्या 23 वर्षीय भावाचा अपघातात मृत्यू

सातारा : रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातारला येत असलेल्या युवकावर शनिवारी रात्री काळाने घाला घातला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून सातार्‍याला येत असताना मेढा बसस्थानकाजवळ एस. टी. ला दुचाकी धडकून हा अपघात झाला. या अपघातात आदित्य संजय साळुंखे (वय 23, रा. सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बसाप्पा पेठ, करंजे, सातारा) असे ठार झालेल्या भावाचे नाव आहे.

आदित्य हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील योगिता डेंटल कॉलेजला बीडीएसच्या चौथ्या वर्षात शिकायला होता. रक्षाबंधनानिमित्त तो दुचाकीवरून सातार्‍याला यायला निघाला होता. शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास मेढा येथे आला असताना सातारा बाजूकडून आलेली एसटी बस स्थानकात जाण्यासाठी उजवीकडे वळली. त्यावेळी साताराच्या दिशेने येत असलेल्या आदित्यची मोटरसायकल अचानकपणे आडव्या आलेल्या एसटीवर आदळली. या अपघातात आदित्यचे हेल्मेट तुटल्याने तो गंभीर जखमी झाला.

अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमी झालेल्या आदित्यने नातेवाईंकांना फोन लावण्यास सांगितले. लोकांनीही त्याला उपचारासाठी दाखल करताना नातेवाईकांना या अपघाताची कल्पना दिली. त्यानंतर त्याला सातारा जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow