संगमेश्वर : सांगवे मुख्य रस्त्यावर दुर्मीळ घोयरा सरडा

Aug 20, 2024 - 14:04
 0
संगमेश्वर : सांगवे मुख्य रस्त्यावर दुर्मीळ घोयरा सरडा

संगमेश्वर : तालुक्यातील सांगवे मुख्य रस्त्यावर रविवारी (ता.१८) घोयरा सरडा अर्थातच् शॅमेलिऑन पाहायला मिळाला. बुरंबी येथील व्यापारी नरेश उर्फ राजू जागुष्टे यांना सांगवे येथे जात असताना मुख्य रस्त्यावर अगदी संथगतीने डायनासॉरसारखा दिसणारा मात्र सरड्याचा आकाराचा प्राणी दिसल्याने त्यांनी दुचाकी थांबवली आणि शॅमेलिऑनचा फोटो मोबाईलमध्ये काढला. वेगात पळता येण्याची क्षमता नसल्याने, संथगतीने जात असलेला हा सरडा एखाद्या वाहनाखाली सापडू नये म्हणून जागुष्टे यांनी त्याला उचलून रस्त्यालगत असलेल्या हिरवळीत सोडले.

आपल्या परिसरात तसेच रानावनात, झाडाझुडपात सहजपणे दिसून येणाऱ्या सरड्यांच्या वर्गात मोडणारा दुर्मिळ असा हा घोयरा सरडा आहे. भारतात घोयरा सरड्याची फक्त एकच जात मिळते नी तीसुद्धा मुख्यत्वे दक्षिणेकडेच घोयरा सरड्याचं वेगळेपणं अगदी त्याच्या दिसण्यापासुनच सुरू होतं. खडबडीत दिसणारं याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपर्ट केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नी 'ज्युरासिक पार्क' पिक्चरमधल्या डायनोसॉरची आठवण करून देणारा याचा जबडा असं "सुंदर ते ध्यान, राहे फक्त झाडावरीच"! याचा कारण म्हणजे घोयरा क्वचितच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही घोयरा झाडाच्या पानांवर पडलेले दवबिंदूच पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या या सरड्याची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते नी चक्क बिळ खोदून त्यात अंडी घालते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow