रेडीमेड मूर्ती व्यवसायाने हिरावला चिपळुणातील मूर्तिकरांचा रोजगार

Aug 20, 2024 - 15:15
 0
रेडीमेड मूर्ती व्यवसायाने हिरावला चिपळुणातील मूर्तिकरांचा रोजगार

चिपळूण : गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या रेडीमेड मूर्ती पेणमधून आणून त्या विकण्याचा व्यवसाय जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे चिपळूणमधील ४५० मूर्ती शाळेत काम करणाऱ्या तब्बल साडेतीन हजार लोकांचा रोजगार हिरावला आहे. मूर्तिकलेतही रेडीमेडचा शिरकाव झाल्याने चिपळूणमध्ये पारंपरिक गणेश मूर्तिकला अडचणीत येण्याचा धोका आहे.

पूर्वीपासून गावागावांत मूर्तिकार गणेशमूर्ती बनविण्याची कला जोपासात आहेत. गावांमध्ये गणेश चित्रशाळा ठरलेल्या असायच्या. त्यावेळी पूर्णपणे मातीच्या मूर्ती बनविल्या जात होत्या. त्याला वापरण्यात येणारे रंगही पर्यावरणपूरक आणि मर्यादित स्वरुपाचे असायचे. गणेश चित्रशाळेत गणपती रंगवण्यासाठी जाताना सोबत लाकडी पाट दिला जात होता. त्यावेळी मूर्तीचे स्वरूप छोटे आणि ठराविक मयदित होते. चिपळूण तालुक्यात एकूण ४५० मूर्तिशाळा आहेत. एका मूर्तिशाळेमध्ये साधारण १० कामगार मूर्ती घडवण्याचे काम करायचे. त्यामुळे चार महिन्यांसाठी अंदाजे साडेचार ते पाच हजार लोकांना रोजगार मिळायचा. हळूहळू प्लास्टरच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी प्रारंभ होऊ लागला. त्यामुळे मातीच्या मूर्तींची मागणी कमी झाली. त्यामुळे मूर्ती शाळेतील कामगारांची संख्याही कमी झाली. आता एका मूर्ती शाळेत एक दोन कामगार असले तरी चालते. त्यामुळे चार महिन्यांसाठी साडेतीन हजार लोकांना मिळणारा रोजगार आता कमी झाला आहे.

मातीच्याच मूर्ती बनविण्याचा सर्वच स्तरांतून आग्रह सुरू अ सुरू आहे. प्लास्टरचा वापर करून मूर्ती बनविल्या जाऊ नयेत, यासाठी जनजागृती सुरू आहे. प्लास्टरचे गणपती आकाराने मोठे बनवताना फारशी अडचण येत नाही. शिवाय गणपती वजनाला हलके असल्याने हाताळणी करताना सोपे जाते. प्लास्टरमधील गणेशमूर्तीच्या किंमतीही तुलनेत कमी असल्याने त्याला अधिक पसंती दशर्विली जातेः मात्र अशा मूर्ती विसर्जनानंतर लवकर पाण्यात विरघळत नसल्याने त्यांची निर्मिती केली जाऊ नये. राजन लवेकर, अध्यक्ष, मूर्तिकार संघटना, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow