कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांना पितृशोक
◼️ जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी सुधाकर देसाई यांचे निधन
रत्नागिरी : कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांचे वडील सुधाकर शंकर देसाई यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
मूळचे हातखंबा येथील सुधाकर देसाई हे जिल्हा परिषद रत्नागिरीच्या बांधकाम विभागात कार्यरत होते. अधिकारीपदावरून ते जिल्हा परिषदेतून निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात त्या जिल्हा परिषदेतून निघणाऱ्या ‘रत्नसागर’ या अंकाच्या संपादनाची अनेक वर्षे जबाबदारी पार पडत होते. याच नावाने कुवारबाव येथील गृहनिर्माण सोसायटी स्थापन करुन ते कार्यरत होते. रत्नसागर या नावाने त्या शैक्षणिक, क्रीडाविषयक संस्थाही स्थापन केल्या होत्या. निवृत्तीनंतर सुद्धा त्या समाजसेवेत कार्यरत होते. कुवरबाव येथील विठ्ठल मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघाचे त्यांनी काम करुन प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. कुवारबावच्या नागरी प्रश्नातही त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल रत्नागिरीतील शासकीय सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:02 02-08-2024
What's Your Reaction?