कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव

Aug 20, 2024 - 15:02
Aug 20, 2024 - 15:38
 0
कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव

रत्नागिरी : कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे यावर्षी प्रथमच कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उत्सवामध्ये जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी होऊन कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा आनंद लुटावा, असे आवाहन कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आले आहे.

सदर जन्माष्टमी उत्सव हा सोमवार दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रौ ०८.३० ते १२.३० या वेळेत साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे राहील.

रात्रौ ०८.३० वा. श्री. प्रसाद शिंदे, काजरघाटी यांचे भजन रात्रौ १०.३० वा. सौ. अमृता शहाणे यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन. त्यानंतर प्रसाद वाटप होऊन उत्सवाची सांगता होईल. सदर कृष्णजन्माष्टमीचा उत्सव हा कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या यशवंत हरी गोखले सभागृह, नाचणे साळवी स्टॉप लिंक रोड येथे सादर होणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. अनंत आगाशे, (मोबा. ७०८३१६२९७५) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow