संगमेश्वरात भाजपकडून रामदास कदम यांचा निषेध

Aug 20, 2024 - 16:03
Aug 20, 2024 - 16:49
 0
संगमेश्वरात भाजपकडून रामदास कदम यांचा निषेध

संगमेश्वर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचा आज संगमेश्वर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुबंई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संगमेश्वर सोनवी चौकात एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. "निम का पत्ता कडवा हैं रामदास कदम भ... हैं" आदी त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढण्यात येऊन त्याचे सोनवी नदीत विसर्जन करण्यात आले.

शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास भाई कदम यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करून बदनामी केल्याने संगमेश्वर पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून आज मंगळवारी सकाळी संगमेश्वर सोनवी चौक येथे एकत्र येत संतप्त भावनेतून रामदास कदम यांच्या विरोधात 'निम पत्ता कडवा हैं, रामदास कदम भ... वा हैं, अरे या रामदास कदमाचे करायचे काय? खाली डोके वरती पाय, अशा घोषणा देत सोनवी चौक दणाणून सोडला होता.

बांधकाम राज्य मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बाबत बदनामीकारक केलेल्या भाष्यामुळे संतप्त झालेले कार्यकर्ते व पदाधिकारी एवढ्यावरच न थांबता त्यांनी रामदास कदम यांच्या प्रतिकारात्मक पुतळ्याची प्रेत यात्रा काढून येथील सोनवी नदीत विसर्जन केले.

या निषेध करणाऱ्या आंदोलनात विनोद म्हस्के, रुपेश कदम, मिथुन निकम, अमित ताठरे, अभी शेट्ये, मुकुंद जोशी, सचिन बडंगले, स्वप्नील शेट्ये, कोमल राहटे, नुपूरा मुळ्ये, शीतल दिंडे, अमोल गायकर, मयूर निकम, प्रशांत रानडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:07 PM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow