चिपळूण बसस्थानकातून दोन लाखांचे मंगळसूत्र चोरीला

Aug 20, 2024 - 16:30
 0
चिपळूण बसस्थानकातून दोन लाखांचे मंगळसूत्र चोरीला

चिपळूण : मध्यवर्ती बसस्थानकात दागिने चोरीचे सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल २ लाख किंमतीचे ४ तोळ्यांचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले. या प्रकरणी चिपळूण पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून संशयिताचा शोध सुरु आहे. दरम्यान, बसस्थानकात सातत्याने होत असलेल्या दागिने चोरीच्या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

१४ ऑगस्ट रोजी दुपारी ही महिला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एसटीची वाट पाहत होती. त्यावेळी प्रवाशांची झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्या महिलेच्या पर्समधून २ लाख किंमतीचे मंगळसूत्र चोरुन नेले. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी गुन्हा दाखल केला. दरम्यान, शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून महिला प्रवाशाच्या दागिने चोरीचे प्रमाण वाढले असून यापूर्वीही अशा बऱ्याच चोरीच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:58 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow