मुख्यमंत्री दौऱ्यासाठी लांजातून १४५ बस; महाविकास आघाडी आक्रमक

Aug 21, 2024 - 09:54
 0
मुख्यमंत्री दौऱ्यासाठी लांजातून १४५ बस; महाविकास आघाडी आक्रमक

लांजा : रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी तालुक्यातून १४५ बस सोडण्यात येणार आहेत. याबाबत तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी आगार येथे धडक देऊन आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांना जाब विचारला.

लांजा आगारातून एकही बस बंद, रद्द करून शालेय विद्यार्थी, व्यापारी, प्रवासी व नागरिकांची गैरसोय झाल्यास लांजा बसस्थानकात बुधवारी (ता. २०) सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात येईल. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला लांजा आगार प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देऊन तसे निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांनाही निवेदन देण्यात आले. 

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष अनंत जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख नागेश कुरूप, काँग्रेस शहराध्यक्ष रवी राणे, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष धनिता चव्हाण, आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 21-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow