संगमेश्वर : शृंगारपुरातील उपोषण पाच दिवस सुरूच; आंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटणार

Aug 21, 2024 - 09:45
 0
संगमेश्वर : शृंगारपुरातील उपोषण पाच दिवस सुरूच; आंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटणार

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर-नायरी-कातुर्डी मार्गावर नायरीफाटा येथे रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी द्या, या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून ग्रामपंचायत सरपंच विनोद ऊर्फ बाबू पवार व सहकारी यांनी साखळी उपोषण केले आहे. या उपोषणाची दखल शासकीय यंत्रणेने न घेतल्यामुळे २१ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तत्काळ विकासनिधी मंजूर व्हावा, अशी विनंती निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शृंगारपूर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील आंदोलन सुरूच राहणार आहे. रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उर्वरित सदस्य शृंगारपूर येथे उपोषणात सहभागी होतील. हे उपोषण प्रशासकीय मंजुरीचे पत्र मिळेपर्यंत सुरू राहील, असा इशारा सरपंच पवार यांनी दिला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणावेळी पवार यांची तपासणी केली तेव्हा त्यांची शूगर वाढल्याचे सांगितले तसेच ते शारीरिकदृष्ट्या खचल्याचेही सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow