संगमेश्वर : किल्ले भगवानगडावर स्वच्छता मोहीम

Aug 22, 2024 - 10:51
Aug 22, 2024 - 12:33
 0
संगमेश्वर : किल्ले भगवानगडावर स्वच्छता मोहीम

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील किल्ले भवानगड येथे दुर्गवीर प्रतिष्ठान व किल्ले भवानगड जतन आणि संवर्धन परिवाराच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

सर्व दुर्गवीर सकाळी ६.३० वा. देवरूख येथून निघून गडावर ८ वा. पोहचले. सुरुवातीला गडावरील भवानीमातेच्या मंदिराची स्वच्छता करून भवानीमातेच्या मूर्तीला व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोहिमेला सुरुवात झाली.

गडावरील वास्तूंकडे जाणाऱ्या वाटा साफ करण्यात आल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या गडावरील अनेक जागा मोकळ्या करण्यात आल्या. मोहिमेत योगेश सावंत, आकाश शिर्के, निशांत जाखी, मंगेश शिवगण, दीप्ती साळवी, सिद्धेश टक्के, उत्कर्ष माने, प्रणव राक्षे, सिद्धेश चव्हाण, राहुल रहाटे, स्वरूप नलावडे, तेजल डाफळे, स्नेहल कोकरे, श्रेयस शेट्ये, सचिन कदम, प्रमोद कुलकर्णी, विवेक चव्हाण, प्रमोद जोगळे, अभिषेक चव्हाण हे सहभागी होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow