गंधशास्त्र हे प्रायोगिक शास्त्र ते आजही कालसुसंगत : डॉ. संकेत पोंक्षे

Aug 22, 2024 - 10:40
Aug 22, 2024 - 14:43
 0
गंधशास्त्र हे प्रायोगिक शास्त्र ते आजही कालसुसंगत : डॉ. संकेत पोंक्षे

रत्नागिरी : भारतीय शाखपरंपरेतील गंधशास्त्र हे प्रायोगिक शाख आहे. त्यामुळे ते आजच्या काळातही पूर्णपणे कालबाह्य ठरत नाही. नवनवीन प्रयोगांना मोठा वाव आहे. प्रतिभेला, सर्जनशीलतेला महत्त्व आहे. असे प्रतिपादन डॉ. संकेत पोंक्षे यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे आयोजित संस्कृत दिन कार्यक्रमावेळी त्यांनी केले. गोगटे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. पोंक्षे एम.ए. (संस्कृत सुवर्णपदक). बी.एड्.. पीएच. डी.. सेट, संस्कृत विशारद आहेत. त्यांनी गंधशास्त्रात पीएच.डी. केली आहे. त्यांनी सांगितले की, विविध सुगंध, सुगंधी द्रव्य, गुणधर्मांचे व वापराचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते, याचे अनेक संदर्भ ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद यामध्ये आलेले आहेत. रामायण, महाभारतामध्येही सुगंधी तेलाचे उल्लेख आहेत. कौटिलीय अर्थशास्त्र चंदन, अगरू आणि कालिकापुराणातही पाच प्रकारचे सुगंध, सहा प्रकारचे धूप, काजळाचे सहा प्रकार याविषयी माहिती आहे. सुगंध बनवणाऱ्या, द्रव्यांचा व्यापार करणाऱ्या लोकांचा गान्धिक म्हणजे गांधी असा वर्ग तेव्हा तयार झाला होता. सुगंधाच्या व्यापारात शंभरपटीने जास्त फायदा मिळत होता. बाराव्या शतकांत साहित्यिक गंगाधर याने गंधसार या ग्रंथात गंधशाखाविषयी माहिती दिली आहे. परिभाषा, प्रयोग, परीक्षा, आदी तीन विभागांत हा ग्रंथ आहे. असे त्यांनी सांगितले.

आज कस्तुरीला पर्याय म्हणजे कस्तुरी भेंडी, जवादी कस्तुरीचा वापर केला जातोय. अगरू हा मौल्यवान वृक्ष आहे. नखी म्हणजे समुद्री शिंपत्याचा प्रकार हा सुद्धा वापरला जातो. अत्तर या शब्दाचे मूळ पर्शियन भाषेत सापडते. प्राचीन काळात भारताबरोबर इजिप्त, इराणमध्ये सुगंधी पदार्थांच्या निर्मितीवर भर दिला जात होता. मुघलांच्या काळात अत्तर निर्मिती जास्त झाली, असे डॉ. पोंक्षे म्हणाले.

पन्नासपेक्षा जास्त धूप
धूपांचे पिंड, खंड, चूर्ण, वर्ती असे प्रकार, तीव्रतेनुसार आणखी असे ५० पेक्षा अधिक प्रकारचे धूप आहेत. विशिष्ट देवतेला संतुष्ट करण्यासाठीचे धूप, अभ्यासासाठी उपयुक्त धूप, चित्तवृत्तींचा प्रक्षोभ करणारा, भ्रमित करणारा, ताप करण्यासाठी, मनोन्मत्त हत्तींना काबूत आणण्यासाठी, तंत्रमार्ग, आदीच्या वापरासाठी धूप सांगितले आहेत, असेही डॉ. पोंक्षे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 22/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow