राजापूर : शिवशक्ती महिला गोविंदा पथकांचा जोरदार सराव सुरू

Aug 23, 2024 - 10:39
Aug 23, 2024 - 12:42
 0
राजापूर :  शिवशक्ती महिला गोविंदा पथकांचा  जोरदार सराव सुरू

राजापूर : दहीहंडी उत्सवाचे आता साऱ्यांना वेध लागले आहेत. दहीहंडी उत्सवानिमित्ताने दहीहंडी स्पर्धेमध्ये सहभागी होवून लाखो रुपयांची पारितोषिक पटकाविण्यासाठी गोविंदा पथकांचे जोरदार सराव सुरू झाले आहेत. शहरातील शिवशक्ती महिला गोविंदा पथकाकडून जोरदार सराव केला जात असून हे पथक मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे येथील दहीहंडी स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये कोकणकन्यांचा जलवा अनुभवायला मिळणार आहे.

शहरातील शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने गेली काही वर्ष रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दहीहंडी स्पर्धेमध्ये सहभागी होत लक्षवेधी कामगिरीच्या जोरावर साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर्षीही लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी हे पथक सज्ज झाले आहे. दोन दिवसांनी मीरा रोड एक्सपर्ट गोविंदा आणि महाराष्ट्र राज्य दहिहंडी गोविंदा असोसिएशन यांच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धेमध्ये प्रशिक्षक प्रतीक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती महिला गोविंदा पथक सहभागी होणार आहे. त्याच्यासह मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आदी भागांमध्ये आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेमध्येही हे महिला गोविंदा पथक सहभागी होणार आहे. महिला गोविंदा पथकाला सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांचे बहुमूल्य असे पाठबळ लाभले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow