जिल्हा हिंदी शिक्षक संघटनेचा चिपळूण येथे उद्या मेळावा

Aug 23, 2024 - 13:57
Aug 23, 2024 - 14:12
 0
जिल्हा हिंदी शिक्षक संघटनेचा चिपळूण येथे उद्या मेळावा

रामपूर : रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक संघटना, रत्नागिरी जि. प. माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण येथे २४ सप्टेंबर रोजी हिंदी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातून एक उपक्रमशील हिंदी शिक्षकांना हिंदी सेवा सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.

इयत्ता नववी दहावीसाठी प्रत्येक तालुक्यात राष्ट्रभाषा हिंदी पंधरवडानिमित्त हिंदी कथाकथन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहेत. यासाठी नारीशक्ती, देशभक्ती, पर्यावरण विषयावर पाच मिनिटे वेळ दिला जाईल. प्रत्येक तालुक्यांनी आपले प्रथम, द्वितीय क्रमांक सलीमा नदाफ, न्यू इंग्लिश स्कूल तळसर मुंडे येथे नावे पाठवावीत. उपक्रमशील हिंदी सेवा सन्मान पुरस्कार प्रस्तावही पाठवावेत. रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक संघटनेच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित केली असून, महाराष्ट्र भाषा हिंदी का संघर्ष, विश्व शांती मे भारत का योगदान, प्रकृती से खिलवाड या विषयावर हिंदी शिक्षकांनी आपले निबंध ५ सप्टेंबरपर्यंत मुग्धा पवार, वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्गताम्हणे, ता. चिपळूण या पत्त्यावर पाठवावेत.

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या नियोजन सभेत अनिलकुमार जोशी यांनी मार्गदर्शन केले. प्रशांत खेडेकर, राजेंद्र खांबे, मिलिंद कडवईकर, मुग्धा पवार, आशिष सरमुकादम, राजेश माळी अन्य कार्यकर्त्यांनी चर्चेत भाग घेतला. समारोप मिलिंद कडवेकर यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow