रत्नागिरी : मासेमारी हाच परवाना देण्याची मागणी

Aug 23, 2024 - 14:37
 0
रत्नागिरी : मासेमारी हाच परवाना देण्याची मागणी

रत्नागिरी : मत्स्योद्योग विकास धोरणात सर्वच प्रकारच्या मच्छीमार नौकांना एकाच प्रकारचा मासेमारी परवाना दिला जावा, अशी मागणी पर्ससीन नेट मच्छीमारांकडून करण्यात आली आहे. राज्य मत्स्योद्योग विकास धोरणासाठी हा अभिप्राय मत्स्योद्योग विकास धोरण बनवणाऱ्या समितीसाठी पाठवण्यात आला असल्याचे रत्नागिरी तालुका पर्ससीन नेट मालक असोसिएशन सचिव जावेद होडेकर यांनी सांगितले.

पारंपरिक आणि पर्ससीन नेट मच्छीमारांमध्ये वादंग निर्माण होतो. ज्याप्रमाणे कोणतेही पीक घेणाऱ्यास शेतकरी संबोधले जाते, त्याप्रमाणे मासेमारी करणाऱ्या सर्वच नौकाना एकच मासेमारी परवाना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोमवंशी अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात १८३ पर्ससीन नौका असाव्यात, असे म्हटले आहे. परंतु जिल्ह्यातील पर्ससीन नेट नौकांची संख्या सुमारे २८० पर्यंत असल्याने मासेमारी हंगाम सुरू करण्याची वेळ आली, तरी परवान्याबाबत संभ्रम आहे. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते, राज्य मत्स्योद्योग विकास धोरण ठरवण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीकडे मच्छीमार संस्था, व्यावसायिक, संघटनांनी हे धोरण कसे अपेक्षित आहे, याबाबत अभिप्राय पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow