दापोली : प्लास्टिक बॅग बंदीसाठी स्वयंसेवी संस्थांतर्फे ठिय्या आंदोलनाचा इशारा

Aug 24, 2024 - 11:41
Aug 24, 2024 - 12:47
 0
दापोली : प्लास्टिक बॅग बंदीसाठी स्वयंसेवी संस्थांतर्फे ठिय्या आंदोलनाचा इशारा

दापोली : प्लास्टिक कॅरीबॅग बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी १ सप्टेंबरपर्यंत करण्यात यावी; अन्यथा ठिय्या आंदोलनाला सामोरे जावे, अशा आशयाचे निवेदन दापोलीतील स्वयंसेवी संस्थांतर्फे निवेदिता प्रतिष्ठानच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी, तहसीलदारांना देण्यात आले.

कायद्याने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगवर शासन- प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्यामुळे दुर्दैवाने आज जलप्रदूषण, जमीन प्रदूषण आणि वायू प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कॅरीबॅग बंदी आदेशाची पायमल्ली झाल्यामुळे या प्लास्टिकचे मानवी शरीरावर आणि पर्यावरणावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याचे अभ्यासानंतर समोर आले आहे. त्यामुळेच शासनाने मानवी स्वास्थ्य आणि निसर्ग स्वास्थ्याकरिता प्लास्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आदेश जारी केला. जिल्ह्यामध्ये सर्वत्रच या आदेशाची पायमल्ली झाल्याचे दुर्दैवाने चित्र दिसत असल्याची सद्यःस्थिती आहे. १ सप्टेंबरपर्यंत कॅरीबॅग बंदी असलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी; अन्यथा ९ ला ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संबंधित स्वयंसेवी संस्थांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:10 PM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow