खेडमध्ये आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन

Aug 24, 2024 - 10:04
Aug 24, 2024 - 10:06
 0
खेडमध्ये आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे  भूमिपूजन

खेड : शहरातील सम्राट अशोकनगर येथे शनिवारी (दि.२४) ऑगस्ट रोजी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११:३० वाजता केले जाणार आहे.

यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, आर. पी. आय. चे कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ, शिवसेना तालुकाप्रमुख साचिन धाडवे, आर. पी. आय. जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष स. तु. कदम, आर. पी. आय. तालुकाध्यक्ष संतोष कापसे, सेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, आर. पी. आय. तालुका कार्याध्यक्ष मिलींद तांबे, भाजपा शहरप्रमुख अनिकेत कानडे, आर. पी. आय. शहरप्रमुख दीपेंद्र जाधव, राष्ट्रवादी शहरप्रमुख इम्तियाज खोत, सार्वजनिक बांधकामच्या उपविभागीय अभियंता आशा जटाळ व खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे आदी उपस्थित राहणार आहेत.

या भूमिपूजन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन खेड शहर शिवसेना, युवासेना व महिला आघाडी यांनी केले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow