चिपळुणात श्रीकृष्ण व्याख्यानमालाचे आयोजन

Aug 24, 2024 - 10:12
 0
चिपळुणात श्रीकृष्ण व्याख्यानमालाचे आयोजन

चिपळूण : शहरातील लक्ष्मीनारायण देवस्थानच्या माध्यमातून मंगळवार दि. २० ते २७ ऑगस्ट या कालावधीत श्रीकृष्ण व्याख्यानमालेसह कृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अखंड नामसप्ताह, श्रीराम नाम जप, पाठांतर स्पर्धा, गुणवंतांचा सत्कार आदी उपक्रम होणार आहेत.

मंगळवार दि. २० ते २७ ऑगस्ट या दरम्यान सकाळी ८:३० वा. नामसप्ताह, रोज सायं. ६ ते ६:३० वा. राम नाम जप, दि. २१ रोजी ६ वा. गुणवंतांचा सत्कार, दि. २५ रोजी सकाळी ९ वा. लक्ष्मीनारायण पाठांतर स्पर्धा, दि. २६ रोजी रात्री १०:३० वा. दापोली येथील कीर्तनकार तेजस जोशी यांचे कीर्तन, दि. २७ रोजी गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमाला अंतर्गत दि. २० रोजी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. यश वेलणकर यांचे 'मानसिक स्वास्थ्य आणि भावनांची सजगता', दि. २१ रोजी प्रा. आनंद मराठे यांचे 'कातशिल्पांचे गृहविश्व' या विषयावर माहिती व स्लाईड शो, दि. २२ रोजी डॉ. विक्रम घाणेकर यांचे 'रामहर्षक उत्तर ध्रुव' विषयावर माहिती व स्लाईड शो कार्यक्रम होईल. दि. २३ रोजी पुणे येथील समाजशास्त्र अभ्यासक प्रवीण पाटील यांचे 'भारतात आफ्रिकेतील फोरलाई पोर्तुगीज, दि. २४ रोजी रविराज पराडकर पांचे 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे सांस्कृतिक योगदान, दि. २५ रोजी संस्कृत अभ्यासक प्रणव गोखले यांचे 'स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन 'वावर व्याख्यान होईल. सर्वांनी व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow