लांजा : भांबेडच्या राजाचा उद्यापासून उत्सव
लांजा : तालुक्यातील भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड-पेठदेव या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ६ ते १७ सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. १९८१ मध्ये स्थापना झालेल्या या उत्सवाचे ४२ वे वर्ष आहे.
"श्री" ची ७ ला प्रतिष्ठापना रोजी होईल. ८ ला सकाळी १० वा. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक गट व माध्यमिक गटामध्ये मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा (२५ श्लोक) होईल. या दोन्ही गटांसाठी अनुक्रमे ७७७ रु., ५५५ रु. ३३३ रु. व चषक, प्रशस्तीपत्रक अशी बक्षिसे आहेत. विकास तुकाराम कोकाटे पुरस्कृत लांजा तालुकास्तरीय घरगुती मखर सजावट स्पर्धा आहे. त्यामध्ये १५००, १०००, ७५० रुपये व चषक प्रदान करण्यात येणार आहे. १७ ला "श्री"ची भव्य विसर्जन मिरवणूक संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील सर्व कलारसिकांनी या कार्यक्रमांचा सहभाग घ्यावा, असे आवाहन नवयुग उत्कर्ष युवक मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र लाड, उपाध्यक्ष प्रमोद गांगण, उत्सव समिती अध्यक्ष महेश गांगण, अमोल रेडीज, राजेंद्र गांधी, ऋषिकेश बेर्डे, अनिस वाघु, प्रकाश जोशी आदींनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 06/Sep/2024
What's Your Reaction?