लाडकी बहीण योजना : महिलांची शिधापत्रिका अपडेट करण्यासाठी धावपळ

Jul 13, 2024 - 14:51
Jul 13, 2024 - 14:55
 0
लाडकी बहीण योजना : महिलांची शिधापत्रिका अपडेट करण्यासाठी धावपळ

चिपळूण : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील दरमहा १५०० रुपये मिळवण्यासाठी महिलावर्ग ठिकठिकाणी गर्दी करत होते. त्यामुळे अनेक वर्षानंतर रेशनकार्ड अपडेट केली जात आहेत. विवाह होऊन अनेक वर्षे लोटली तरीही आई-वडिलांच्या रेशनकार्डवर असलेली नावे कमी करून ती पत्तीच्या रेशनकार्डवर चढवण्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठाविभागात अनेकांनी गर्दी केली आहे. त्पास्चठी आठवडाभरात एक हजार अर्ज दाखल झाले आहेत तसेच आधारकार्ड, अधिवास, उत्पत्र दाखले काढण्यासाठीही झुंबड उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी शासनाने लाडकी बहीण ही नवी योजना आणली आहे. या योजनेतून पात्र बहिणीला दरमहा पैसे दिले जाणार आहेत. २१ ते ६५ वयोगटांतील विवाहित महिला प्रत्येक कुटुंबातील एका अविवाहितेला हा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ उठवण्यास्राठी विविध गटांतील महिला एकमेकींचा आधार घेत विविध प्रशासकीय कामे करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात दाखल होत आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी रेशनकार्ड व त्यावर नाव असणे महत्वाचे आहे. त्यामुळे विवाह होऊन १० वर्ष व त्यापेक्षा कमी वर्षे होऊनही अद्यापही पतीच्या रेशनकार्डवर न आलेल्या महिलांनी आता इतकी वर्षे माहेरच्या रेशनकार्डवर असलेली नावे कमी करण्यास सुरुवात केली आहे. नावे सासरच्या कार्डवर आणण्यासाठीचे अर्जही वाढलेले आाहेत. दिवसाला १०० ते १५० अर्ज तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागात येत आहेत. आठवडाभरात १ हजार अर्ज दाखल झाले आहेत, तसेच अधिवास दाखल्याची अट सध्यातरी नसली तरी शासन ती आणू शकते, अशी भीती असल्याने अनेक महिला हा दाखला काढण्यासाठी सेतू महा ई-सेवा केंद्रांमध्ये येत आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी मिळून दिवसाला ५० अर्ज दाखल होत आहेत. उत्पनाच्या दाखल्याची अटही रद्द करण्यात आली आहे. तरीही दाखला असावा, तो काय वाया जात नाही, असे म्हक्त हा दाखला मिळवण्यासाठी दिवसाला २००हून अधिक अर्ज येत आहेत.

सासरच्या कार्डावर नाव नोंदणी
विवाह होऊन १० वर्षे व त्यापेक्षा कमी वर्षे होऊनही अद्यापही पतीच्या रेशनकार्डवर न आलेल्या महिलांनी आता इतकी वर्षे माहेरच्या रेशनकार्डवर असलेली नावे कमी करण्यास सुरुवात केली आहे. नावे सासरच्या कार्डवर नाव नोंदणी करण्याचे अर्जही वाढलेले आहेत. दिवसाला १०० ते १५० अर्ज तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागात येत आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow